Pole Climbing Device

पोल क्लायम्बिंग डिवाइस

पी. सी. डि.  तुमची कामाची कॅपॅसिटी वाढते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पोल चढू शकता आणि जास्तीत जास्त काम पण करू शकता.

संपर्क

फ्री अनुमान मागवा !

आमच्याविषयी

पोल क्लायम्बिंग डिवाइस काय आहे?

पी. सी. डि. पोल वर चढणे सहज व सोपे करण्यासाठी बनवले आहे. त्याचा प्रत्येकांना फायदा व्हावा हीच माझी इच्छा आहे.
पोल चढताना प्रत्येक ठिकाणी परिस्थिती थोडी वेगळी असू शकते, ज्याप्रमाणे एखादी गाडी चालवताना प्रत्येक ठिकाणी रस्ता आणि परिस्थिती वेगळी असू शकते तसे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विचार करून जास्त रिस्क न घेता वापर करावा. पीसीएम तुमची कामाची कॅपॅसिटी वाढते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पोल चढू शकता आणि जास्तीत जास्त काम पण करू शकता.
प्रश्न-उत्तरे

पी. सी. डि. वापरण्यासंबंधी प्रश्न-उत्तरे

01.

पोल वरून घसरत नाही ना ?

नाही. याला ग्रिप पाईप बसवले आहे,त्यामुळे पोल वर चांगली पकड बसते आणि घसरत नाही.
02.

मजबूत आहे काय ? वजन किती सहन करते ?

होय चांगलं मजबूत आहे. 200 kg पर्यंत वजन सहन करू शकते.

03.

किती दिवस टिकते ?

5 ते 7 वर्ष सहज टिकते 75 kg पर्यंत वजन असेल तर 7 वर्ष सहज टिकते त्यापेक्षा जास्त असेल तर 5/6 वर्ष टिकेल (वजनावर आणि वापरण्यावर अवलंबून आहे.)

04.

कोण-कोणत्या पोल वर वापरता येते ?

महावितरण कंपनीत वापरल्या जाणाऱ्या सर्व PSC व RSJ पोलवर वापरता येते. तसेच जुन्या पोलवर सुद्धा वापरता येते. हे ऍडजेस्टेबल आहे. फक्त सिलेंड्रिकल पोल वर वापरता येत नाही

05.

याचे वजन किती आहे ?

3 kg

06.

शॉक प्रुफ आहे काय ?

नाही हे शॉक प्रूफ नाही.

07.

शॉक प्रूफ नाही तर याचा काय फायदा ?

हे डिव्हाईस पोल वर चढण्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे सर्व पोल वर चढण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो. आणि ते शॉक प्रुफ यासाठी नाही की, शॉक  प्रुफ आहे असे जर सांगितले तर आपल्याला चालू लाईन वर पण काम करता येईल बरोबर ना ? पण तस होत नाही कारण आपण पोल वर चढल्यानंतर काम करत असताना आपण दोन्ही हातांनी काम करतो आणि पोल वर तीन फेज ऐक न्युट्रल व ऐक एर्थिंग असते त्यामुळे करंट कुठूनही येऊन आपल्या दोन हातामधून पास होऊन आपल्याला शॉक लागुशकतो. त्यामुळे हे शॉक प्रुफ नाही.

08.

PCD घेतल्याने मला काय फायदा होऊ शकतो ?

तुम्ही पोलवर जेव्हा चढता तेव्हा वर जाईपर्यंत तुमची अर्ध्यापेक्षा जास्त ताकद संपलेली असते. चढल्यानंतर झोपाळ्यात बसून तुम्हाला काम पण करायचे असते. PCM चा वापर केल्याने तुमचे बरेच शारीरिक श्रम वाचतात. हे वापरून पोल वर चढल्यास तुम्हाला शारीरिक थकवा येणार नाही,महत्वाचं हे की तुमच्या हातावर अजिबात ताण येत नाही त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता वाढते, सोबतच हे वापरणे सोपे आहे, आणि कॅरी करणे पण सोपे आहे. खास करून शेती ग्राहकांच्या कंप्लेंट काढण्यासाठी. शेतामध्ये गाडी चालवताना याची तुम्हाला काहीच अडचण होत नाही. ते ऐका पिशवीमध्ये पण बसते.आणि मजबूत पण आहे.

9.

काही ठिकाणी पायातून काढून वर चढून काम करावे लागते ?

हो तसे करावे लागते.त्यासाठी याला ऐक पोल होल्डर स्प्रिंग दिले आहे ते पोल वर सांगितले त्या पद्धतीने फिट करून त्यातून पाय काढून तुम्ही वर जाऊन काम करू शकता. त्यावेळी हे पोल वर पक्के राहील व खाली पडणार नाही. काम झाल्यानंतर पायात घालून स्प्रिंग रिलीज करून तुम्ही खाली येऊ शकता.हो तसे करावे लागते.त्यासाठी याला ऐक पोल होल्डर स्प्रिंग दिले आहे ते पोल वर सांगितले त्या पद्धतीने फिट करून त्यातून पाय काढून तुम्ही वर जाऊन काम करू शकता. त्यावेळी हे पोल वर पक्के राहील व खाली पडणार नाही. काम झाल्यानंतर पायात घालून स्प्रिंग रिलीज करून तुम्ही खाली येऊ शकता.

10.

ग्रीप पाईप किती दिवसांनी बदलावा लागतो, नाही बदलला तर काय होईल ?

ग्रिप पाईप खराब झाल्यानंतर बदलून घेणे आवश्यक आहे, जर तो बदलला नाही तर हे सटकण्याचे शक्यता असते. ज्याप्रमाणे गाडीचे टायर खराब झाल्यानंतर आपल्याला लगेच बदलून घेणे आवश्यक असते तसेच.

सूचना

पी. सी. डि.  वापरण्यासंबंधी सूचना

01.

शॉकप्रूफ नाही

पीसीएम शॉकप्रूफ नाही. हे चालू लाईन वर काम करण्यासाठी वापरू नये.
02.

पोल ची साईज

पोल ची साईज बघून पीसीएम ऍडजेस्ट करावे

03.

अर्धवट लावू नये

पीसीएम पोलमध्ये पुर्ण बसवावे लावावे अर्धवट लावू नये.अर्धवट लावल्याने त्याची ताकद कमी होऊन वाकण्याची चान्सेस वाढतात

04.

वजन

पहिला पाय व्यवस्थित व सरळ लागल्यावरच त्यावर वजन देऊन दुसरा पाय उचलावा.

05.

तोल

 पोल हातातून सोडू नये व तोल मागे जाणार नाही याची काळजी घ्यावी.

06.

अंतर

 जास्त लांब पाय टाकून चढू नये, साधारण एक फूट अंतरवर पाय टाकावा.

07.

झोपाळा

 झोपाळा वापरूनच काम करावे काम करायला सोपे जाते व सुरक्षित पण आहे.

08.

काळजी

तिरप्या पोलवर चढतानाही काळजी घ्यावी कारण तोल एका बाजूला जातो. तिरप्या पोलवर चढतानी पोल ज्या बाजूला झुकला आहे त्या बाजूने चढू नये 100% घासरण्याचे चांसेस असतात.

09.

स्लिप

पावसाळ्यामध्ये जपूनच काम करावे कारण पोल ओले व शेवाळलेले असतात असतो त्यामुळे स्लिप होण्याची शक्यता असते.

10.

चावी

 काम झाल्यानंतर पीसीएम चावी पकडणे टाईट करावी. म्हणजे चावी गळून पडत नाही.

11

त्रेड

 चावी जबरदस्तीने टाईट करू नये, चावीची त्रेड फ्री आहेत. जबरदस्ती केल्याने ते खराब होण्याची शक्यता असते.

12

प्लास्टिक पाईप

प्लास्टिक पाईप खराब झाल्यावर लगेच बदलावा. पीसीएम तसेच वापरू नये त्याची ग्रिप कमी होते आणि पीसीएम स्लिप होण्याचे चांसेस वाढतात.

13.

चेक

 पीसीएम अधून मधून चेक करत चला. सर्व वेल्डिंग व्यवस्थित आहे की नाही. जंग चढणार नाही याची काळजी घ्या नेहमी वापरात ठेवा. (झोपाळा पकड चेक करतो तसे अधूनमधून चेक करा.)

Testimonials

Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus.

Click edit button to change this text excellent plumbing services sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis. Proin gravida nibh vel velit auctor aliquet.
Donald Hunter
Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia showed up within 2 hours dolor sit amet aptent taciti sociosqu ad litora egestas quam...
Mike Hughes
Click edit button to change this text excellent plumbing services sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis. Proin gravida nibh vel velit auctor aliquet.
RACHEL HUDSON

See Our Reviews On

Google Reviews logo
BBB logo
Facebook Reviews logo
Yelp logo

Quick Service On Emergency Call - 24/7

Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus.

Translate »